- देहुरोड पोलिसांची कारवाई; तिघांना समजपत्र…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २६ जून २०२३) :- जनावर कत्तलीचा कोणताही परवाना नसताना विनापरवाना, तसेच पशु वैद्यकिय अधिकारी यांचा जनावर कत्तलीच्या अनुषंगाने अवश्यक ते प्रमाणपत्र नसताना बेकायदेशिररित्या आरोपी दोघांनी म्हशीला जिवे ठार मारून तिची कत्तल केली.
तसेच आरोपीकडे मांस वाहतुकीचा कोणताही परवाना नसताना बेकायदेशिररित्या रिक्षामध्ये त्या मांसाची वाहतूक करीत असताना आरोपी मिळून आला, असे फिर्यादीत म्हटले आहे.
हा प्रकार (दि. २५) रोजी सकाळी ६.०० च्या सुमारास कादीर मटन शॉप, शितळानगर, मामुर्डी देहूरोड येथे घडला.
देहुरोड पोलिसांनी आरोपी हसन मोहमद कुरेशी, ईरफान हसन कुरेशी, शाकीर अहमद सय्यद यांच्या विरोधात ३४८/२०२३ भादवि कलम ४२९.३४ महा प्राणी संरक्षण अधि. १९७६ चे कलम ६,७,९ सह मोटार वाहन अधि १९८८ चे कलम ६६ / १९२ (अ) प्रमाणे गुन्हा दाखल करीत त्यांना सीआरपीसी ४१ (ञ) (१) प्रमाणे समजपत्र दिले आहे.
















