न्यूज पीसीएमसी नेटवर्क
चिंचवड ( दि. २८ मार्च ) :- पार्थ पवार यांच्या मावळ लोकसभा निवडणूकीच्या प्रचारसाठी पिंपरी गावठाण ते चिंचवड मधील चाफेकर चौक यादरम्यान राष्ट्रवादी युवक काँग्रेस आणि महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस व मित्र पक्षांच्या वतीने बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.
बाईक रॅलीत पार्थ अजित पवार, राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष धीरजभैय्या शर्मा, महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजीत तांबे, राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे पिंपरी चिंचवड चे शहराध्यक्ष संजोग वाघेरे, उपाध्यक्ष अमित बच्छाव, युवक अध्यक्ष विशाल वाकडकर, पदाधिकारी, नगरसेवक, कार्यकर्ते व नागरीक हजारोंच्या संख्येने सहभागी होते.

बाईक रॅलीत हातात राष्ट्रवादीचा झेंडा घेऊन सुमारे ३०० सहकारी मित्रांनी व कार्यकर्त्यांनी पार्थ पवारांबरोबर सहभाग नोंदवून पार्थ पवार यांना मोठ्या मताधिक्याने विजयी मिळवून देण्यासाठी जयघोष करत शक्ती प्रदर्शन केले. बाईक रॅली पिंपरी गावठाण येथून निघाली ते चिंचवडमधून क्रांतिवीर चाफेकर चौकात रॅली स्थिरावली व तिथे सांगता झाली.










