न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०५ जुलै २०२३) :- मातंग समाज व तत्सम १२ ‘पोटजातीतील गुणवत्ता प्राप्त विद्यार्थ्यांना महामंडळातर्फे साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे शिष्यवृत्ती दिली जाणार आहे. यातून विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी चालना, शिक्षणासाठी प्रोत्साहन मिळण्यास मदत होणार आहे. यासाठी पात्र विद्यार्थ्यांनी अर्ज करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.
त्यासाठी गुणपत्रक, रेशन कार्ड, शाळा सोडल्याचा दाखला, जातीचा दाखला, उत्पन्नाचा दाखला, आधार कार्ड, दोन फोटो, बोनाफाइड सर्टिफिकेट आदी कागदपत्रे आवश्यक आहेत.
कागदपत्रांसह अर्ज भरून डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन परिसरातील साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळाच्या कार्यालयात सादर करावा लागणार आहे. शिष्यवृत्ती योजनेसाठी १५ जुलैपर्यंत अर्ज सादर करावा लागणार आहे. यासाठी कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
दहावी, बारावी, पदवी, पदव्युत्तर, वैद्यकीय व अभियांत्रिकी इत्यादी अभ्यासक्रमात सन २०२२-२३ या शैक्षणिक वर्षात सरासरी ६० टक्के किया त्यापेक्षा जास्त गुण प्राप्त घेऊन उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे. ज्येष्ठता व जास्त गुण क्रमांकानुसार जिल्ह्यातील विद्यार्थ्यांस निधीच्या अधीन राहून शिष्यवृत्ती दिली जाणार आहे.















