न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०६ जुलै २०२३) :- खेड तालुक्यात श्री क्षेत्र भानोबाची कोयाळी गावात बिबट्याची दहशत निर्माण झाली आहे. कोळेकर वस्ती येथील घरा समोरून बिबट्याने थेट कुत्र्याला ओढून नेलं आहे. कोयाळी गावातील संतोष आणि भानुदास इंगळे यांच्या घरासमोरील अंगणात घडला प्रकार घडला आहे.
https://twitter.com/i/status/1676847347823964166
बिबट्याने केलेल्या कुत्र्याच्या शिकारीचा थरार सीसीटीव्हीत कैद झाला आहे. या व्हिडीओत तीन कुत्रे आणि बिबट्यांची खडाजंगी दिसत आहे. तीन कुत्रे आणि बिबटे एकमेकांवर भिडलेले दिसत आहे. त्यात काही वेळाने थेट बिबट्याने कुत्र्यावर हल्ला केला आणि त्याला तोंडात धरुन कुत्र्याची शिकार केल्याचं दिसत आहे. यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झालं आहे. वन विभागाने लवकर पावले उचलण्याची मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.
मागील महिन्यात पुण्यातील चाकण एमआयडीसीमध्ये पहाटे बिबट्या आढळला होता. हा बिबट्या मर्सडिज बेन्ज या आंतरराष्ट्रीय कंपनीत घुसल्याचं कंपनीमधील एका चालकाच्या निदर्शनास आलं होतं. त्यानंतर सुरक्षा रक्षकांनी प्रत्यक्षात त्या ठिकाणी जाऊन बिबट्या असल्याची खात्री करून घेतली. तसेच त्यांनी याबाबत वनविभागाला कळवलं होतं. जवळपास सात तासांच्या थरारानंतर बिबट्याला जेरबंद करण्यात यश आलं होतं.














