न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०६ जुलै २०२३) :- मावळ तालुक्यातील वडगाव येथील एका सोसायटीत एका १३ वर्षीय मुलाचा चौथ्या मजल्यावरून पडून मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. सकाळच्या वेळी चिमण्या पाहण्यासाठी गेला होता. मात्र, पावसामुळे निसरड्या जागेवरून त्याचा पाय घसरला आणि तो चौथ्या मजल्यावरून खाली पडला आणि यातच त्याचा मृत्यू झाला.
अभिनव जगदीश कडधाने (वय १३) असं मृत्यू झालेल्या मुलाचे नाव आहे. तो वडगाव मावळ येथील संभाजीनगर भागातील कृष्णा पार्क सोसायटीमध्ये राहायला होता. कुटुंबाला कळताच त्याला घरच्यांनी तात्काळ दवाखान्यात दाखल केले, पण त्यातच त्याचा मृत्यू झाला.
तो वडगाव मावळ परिसरातील रमेशकुमार सहानी इंग्लिश स्कूलमध्ये इयत्ता सातवीमध्ये शिक्षण घेत होता. शाळेमध्ये देखील अभिनव मित्रांचा लाडका होता. सर्वांशी मिळून मिसळून राहणे त्याला आवडत होते.














