न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पुणे (दि. २९ मार्च) :- पुण्यात मेट्रोचे काम सुरु असताना भुयारी मार्ग सापडला आहे. या भुयारी मार्गाची लांबी ५७ मीटर आहे. महामेट्रोने दिलेल्या माहितीनुसार पूर्वीच्या काळी कात्रज तलावातील पाणी पुणे शहराच्या वेगवेगळ्या भागात पोहोचवण्यासाठीची ही व्यवस्था म्हणजे हे सापडलेले भुयारी मार्ग आहे.
दरम्यान, या भुयाराची महापालिकेला तसेच भारतीय पुरातत्त्व संशोधक विभागालाही महामेट्रोने दिली असून, संबंधित अधिकारी लवकरच याची पाहणी करणार आहेत.










