न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १२ जुलै २०२३) :- बॉश इंडोस्पेस इंडस्ट्रियल पार्कमधील कामगार आरोपी यांनी संगणमताने स्वतःच्या आर्थिक फायदयाकरीता एकुण ३१,७३,६३३ रुपये किंमतीचे इन्जेक्टर ०४४५१२०३६९८७९ पार्ट चोरून नेले.
पोलीसात तक्रार देणार असल्याचे समजताच आरोपींनी त्यापैकी ३१,५७,८४४ रुपये किंमतीचे इन्जेक्टर ०४४५१२०३६९८७९ पार्ट परत वेअर हाऊसमध्ये आणुन ठेवला. परंतु, १५,७८९.२२ रुपये किंमतीचे बॉश कंपनीचे इन्जेक्टर ०४४५१२०३६९८७९ पार्ट २ नग मिळुन आले नाहीत, असे फिर्यादीत म्हटले आहे.
ही घटना (एप्रिल २०२३ ते जुलै २०२३) दरम्यान बॉश लिमिटेड (वेअर हाऊस) इंडोस्पेस इंडस्ट्रियल पार्क, मौजे महाळुंगे इंगळे येथे घडली. फिर्यादी कुणाल अजित बारटक्के (वय ३९ वर्षे) यांनी आरोपी महिंद्रा लॉजिस्टिक कडील कामगार संतोष भागुजी गारगोटे, राजु सुरेश बेकर, संदिप सोपान साळवे यांच्या विरोधात फिर्याद दिली आहे. महाळुंगे एमआयडीसी पोलिसांनी ३९० / २०२३ भा.द.वि.क. ३८१,३४ प्रमाणे गुन्हा दाखल करीत दोघांना अटक केली आहे.














