न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १२ जुलै २०२३) :- जुन्या भांडणाच्या वादातुन फिर्यादीला आरोपींनी शिवीगाळ केली. आरोपीने हातातील लोखंडी कोयत्याने मारहाण करुन व त्याच्या दोन साथीदारांनी लाथाबुक्क्यांनी मारहाण करून फिर्यादीला जखमी केले. हा प्रकार (दि. ११) रोजी रात्री ००.४५ च्या सुमारास फिर्यादी हे त्यांच्या अपंग मित्राला त्याच्या घरी सोडण्याकरीता जात असताना हॉटेल आर्यन समोर, तपोवन मंदिर रोड, पिंपरी येथे घडला.
फिर्यादी प्रमोद घनशाम कांबळे (वय ४९ वर्षे,रा. हरिओम सोसायटी, घरकुल चिखली) यांनी आरोपी डिगंबर विठ्ठल कुदळे (वय २८ वर्षे, रा. तपोवन मंदिर रोड, पिंपरी), निलेश बाळु कुदळे (वय ४२ रा. सदर), नरेश गजानन पवार (वय ५० वर्षे रा. कैलास कुदळे वाडा, पिंपरी) यांच्या विरोधात फिर्याद दिली आहे.
पिंपरी पोलिसांनी ७१९/२०२३ भादवि कलम ३२४, ३२३, ५०४,३४ आर्म एक्ट कलम ४, २५, महाराष्ट्र पोलीस अधि. कलम ३७ (१) (३) सह १३५ प्रमाणे आरोपींवर गुन्हा दाखल केला आहे.














