न्यूज पीसीएमसी नेटवर्क
प्राधिकरण (दि. ३० मार्च) :- निगडी, प्राधिकरणातील स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळाच्या सभागृहात ७ एप्रिल रोजी सकाळी साडेआठ ते दुपारी साडेबारा या वेळेत मंडळातर्फे एनडीए आणि व एसएसबी म्हणजेच राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या या वर्षीच्या आगामी प्रवेश परीक्षेच्या पूर्वतयारीसाठी विशेष वर्ग व प्रशिक्षण मेळावा आयोजित करण्यात आला आहे.
ब्रिगेडियर (निवृत्त) हेमंत महाजन आणि ब्रिगेडियर (निवृत्त) बलजीतसिंग गिल हे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार आहेत. सावरकर मंडळाच्या स्पर्धा परीक्षा विभागामार्फत एनडीए प्रवेश परीक्षेच्या पूर्वतयारीसाठीचा २२ एप्रिल ते २ जून २०१९ या कालावधीत प्रशिक्षण वर्ग घेतला जाणार आहे. या प्रशिक्षण वर्गासाठी एनडीएच्या नियमानुसार, इच्छुक विद्यार्थ्यांचा वयोगट हा १६ ते १९.५ वर्षे असा आहे. म्हणजेच इयत्ता दहावीची परीक्षा दिलेले विद्यार्थी तसेच इयत्ता ११ वी आणि १२ वीचे विद्यार्थी देखील या प्रशिक्षण वर्गासाठी पात्र ठरू शकतात.
मंडळातर्फे मागील दोन वर्षी घेतलेल्या प्रशिक्षण वर्गातून दोन विद्यार्थी NDA व TES मध्ये निवडण्यात आले आहेत. तसेच या वर्गात प्रशिक्षण घेतलेले १० विद्यार्थी ‘एनडीए’ची लेखी परीक्षा उत्तीर्ण झाले आहेत. ७ एप्रिल रोजीच्या मेळाव्यात सहभागी होण्यासाठी तसेच प्रशिक्षण वर्गाच्या अधिक माहितीसाठी ९२७००३१४७१ मोबाईलवर अथवा ०२०-२७६५९०१० या दुरध्वनी क्रमांकावर सकाळी साडेनऊ ते दुपारी साडेबारा आणि दुपारी चार ते सायंकाळी साडेसात या वेळेत संपर्क साधावा. एनडीए’ प्रवेश परीक्षा प्रशिक्षण वर्गासाठी मर्यादित जागा शिल्लक आहेत. इच्छुक विद्यार्थ्यांनी त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.










