न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १३ जुलै २०२३) :- कसत असलेल्या शेतात फिर्यादीसह त्यांची सासू व जाऊबाई असे सर्वजण काम करीत होते. तेव्हा तिघा आरोपींनी फिर्यादी यांना शिवीगाळ व दमदाटी केली. सह आरोपी हिने तिच्या हातातील कोयता फिर्यादीच्या डोक्यात उजव्या बाजूस मारून त्यांना जखमी केले आहे.
हि घटना (दि. १२) रोजी दुपारी १२.०० च्या सुमारास मौजे आढले, ता. मावळ, जि.पुणे येथील जमीन गट नं २३९ मध्ये घडली. महिला फिर्यादी यांनी आरोपी ओकार बाळू घोटकुले (वय २३ वर्षे), बाळु सोनबा घोटकुले )वय ५० वर्षे), महिला आरोपी (सर्व रा. आढले, ता. मावळ जि.पुणे) यांच्या विरोधात फिर्याद दिली आहे.
शिरगाव पोलिसांनी १८२/२०२३ भादवि कलम ३०७,५०४, ५०६, ३४ महा.पो.का.क ३७ (१),(३) भारतीय हत्यार कायदा कलम ४ (२५) प्रमाणे गुन्हा दाखल करीत दोघांना अटक केली आहे.















