- केंद्र प्रमुखांकडून दोन शाळांच्या चालक मालकांवर गुन्हा दाखल…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १३ जुलै २०२३) :- अनाधिकृतपणे शाळा उभारून शाळेचे चालक व मालक यांनी स्वतःच्या फायदयासाठी शाळा अधिकृत आहे, असे भासवले. अनाधिकृत शाळा अधिकृत म्हणून चालवून, शासनास आवश्यक असलेला महसूल बुडवला. शासनाची, पालकांची व विदयार्थांची फसवणुक केली.
तसेच शासनाने ठरवून दिलेल्या नियम व अटी यांची कोणत्याही कागदपत्रांची पूर्तता न करता शाळा सूरू केली. विदयार्थांची अनधिकृतरित्या भरती करून, पटावर नोंदणी केली. विदयार्थांकडून अनधिकृतपणे भरमसाठ फी वसूल केली. शाळा अनाधिकृत असूनसुध्दा शाळा अधिकृत आहे ,असे भासवून इतर शाळांना दाखला मागणी करणे, विदयार्थांचा शाळा सोडल्याचा दाखले घेणे-देणे अशा बेकायदेशीर बाबी केल्या.
याप्रकरणी हिंजवडीतील सिम्बॉयसीस कॉलेज शेजारील बुधराणी नॉलेज फाऊंडेशन संचलीत ‘ब्लिस इंडीफाय इंटरनॅशनल स्कुल’ आणि माणमधील ओझरकरवाडी रस्त्यावरील ‘रुडीमेंट इंटरनॅशनल स्कुल’ या दोन बेकायदेशीरपणे चालविल्या जाणाऱ्या शाळांवर शासनाने कारवाई केली आहे.
या प्रकरणी शासनाच्या शाळांचे केंद्रप्रमुख सुरेश सावळे यांनी रुडीमेंट इंटरनॅशनल स्कुलचा मुख्याद्यापक विनीत भारद्वाज आणि महीला आरोपी तसेच बुधराणी नॉलेज फाऊंडेशन संचलीत ब्लिस इंडीफाय इंटरनॅशनल स्कुलचा मुख्याध्यापक सिझा अली खान, गौतम बुधराणी संस्थेचे अध्यक्ष / मालक शैक्षणीक संस्थेचे संचालक व चालक यांच्या विरोधात हिंजवडी पोलीस ठाण्यात ७८९ आणि ७९०/२०२३ भा.दं.वि. कलम ४२०, ४६५, ४६८, ४७१, ३४ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.














