- जड, अवजड आणि ट्रॅव्हल्स बसेसच्या वाहतुकीसाठी या वेळा आहेत राखीव…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १३ जुलै २०२३) :- पिंपरी चिंचवड क्षेत्रात औद्योगिकीकरणामुळे लोकसंख्येत झपाटयाने वाढ होत आहे. शहराचा विस्तारदेखील वेगाने होत आहे. चाकण, तळेगाव एमआयडीसीमध्ये तसेच तळवडे, हिंजवडी आयटी क्षेत्रात काम करण्यासाठी कात्रज ते रावेत तसेच रावेत ते कात्रज असा पुणे-मुंबई व मुंबई पुणे या राष्ट्रीय माहामार्गाचा वापर करत आहेत.
या मार्गावर मुंबई बाजुकडुन पुणे बाजुकडे व पुणे बाजुकडुन मुंबई बाजुकडे जाणाऱ्या वाहनांची संख्या मोठी असुन त्यात तळेगाव, चाकण तसेच तळवडे, हिंजवडी आयटी मध्ये काम करणाऱ्या लोकांच्या वाहनांचा अतिरीक्त भार पडत असुन वाहतूक कोंडी होत असते.
शहरातील वाहतुक सुरक्षित व सुरळीतपणे व्हावी यासाठी वाहतूक पोलिसांकडून काही उपाययोजना करण्यात आल्या आहेत. जड / अवजड / ट्रॅव्हल्स बसेस यांना पुढील आदेशापर्यंत प्रवेश बंदी करण्यात आली आहे. ती पुढीलप्रमाणे….
तळवडे वाहतूक विभाग :-
त्रिवेणीनगर ते तळवडे गावठाण ते आय.टी पार्क चौक ते महिंद्रा कंपनी चाकणकडे जाणाऱ्या रोडवर तसेच चाकणकडुन तळवडे आयटी पार्क मार्गे त्रिवेणीनगर कडे येणाऱ्या जड / अवजड वाहनांना सकाळी ०८.०० ते ११.०० व सायंकाळी ५.०० से ९.०० या वेळेत प्रवेश बंद करण्यात आला आहे.
परंडवाल चौक-खंडेलवाल चौक आय टी पार्क चौक तळवडे गांवठाण चिखली गावठाण-डायमंड चौक रामकृष्णहरी चौकाकडे येणाऱ्या तसेच रामकृष्णहरी चौकाकडुन आय टी पार्क चौक तळवडे गांवठाण मार्गे परंडवाल चौकाकडे जाणाऱ्या रस्त्यावर सकाळी ०८.०० ते ११.०० व सायंकाळी ५.०० से ९.०० या वेळेत जड/अवजड वाहनांना प्रवेश बंद.
डायमंड चौक ते कुदळवाडी ब्रिजकडे जाणाऱ्या व कुदळवाडी ब्रीज ते डायमंड चौकाकडे येणाऱ्या रस्त्यावर सकाळी ०८.०० ते ११.०० व सायंकाळी ५.०० ते
रात्री ९.०० या वेळेत जड / अवजड वाहनांना प्रवेश बंद.
कृष्णा चौक साने चौक नेवाळेवस्ती डावीकडुन पिंगळे चौक- सोनवणे वस्ती ज्योतिबानगर चौका दरम्यान जाणे-येणेच्या मार्गावर सकाळी ०८.०० ते ११.०० व सायंकाळी ५.०० ते रात्री ९.०० पर्यंत जड वाहनांस प्रवेश बंद.
निगडी वाहतूक विभाग…
भक्ती शक्ती चौकाकडुन ते त्रिवेणीनगर चौकाकडे जाण्यास जड / अवजड वाहनांना सकाळी ०८.०० ते ११.०० व सायंकाळी ५.०० ते रात्री ९.०० या दरम्यान प्रवेश बंद.
तळवडे रोडकडुन ते भक्ती शक्ती चौकाकडे व त्रिवेणीनगर कडे जाण्यास जड / अवजड वाहनांना सकाळी ०८.०० ते ११.०० व सायंकाळी ५.०० ते
रात्री ९.०० दरम्यान प्रवेश बंद.
दुर्गा चौकाकडुन ते टिळक चौकाकडे जाण्यास जड / अवजड वाहनांना सकाळी ७.०० ते १२.०० ते सायं ५.०० ते रात्री १०.०० या दरम्यान प्रवेश बंद.
थरमॅक्स चौककडुन ते खंडोबामाळ चौकाकडे जाण्यास जड / अवजड वाहनांना सकाळी ७.०० ते १२.०० व ५.०० ते ९.०० या दरम्यान प्रवेश बंद
चिखली पो स्टे ते शाहुनगर चौक ते केएसबी चौक जाण्यास जड / अवजड वाहनांना सकाळी ०८. ०० ते ११.०० व ५.०० ते ९.०० वा दरम्यान प्रवेश बंद
डी. वाय. पाटील ते हैंगिगकडे जाताना रोडलगत जाण्यास जड / अवजड वाहनांना सकाळी ७.०० ते १२.०० ते ५.०० ते ९.०० या दरम्यान प्रवेश बंद
संभाजी चौक ते खंडोबामाळ चौक जड / अवजड वाहनांना सकाळी ८.०० ते १२.०० ते ५.०० ते ९.०० या दरम्यान प्रवेश बंद
रिव्हर व्हयु चौककडुन महावीर चौक छत्रपती शिवाजी महाराज चौककडे जड व अवजड वाहतुकीस सकाळी ०९.०० ते १.०० वा. पर्यंत तसेच सायं. ५.०० ९.०० वा. पर्यंत प्रवेश बंद
चिचवड वाहतूक विभाग
भोसरी ओव्हर ब्रिजचे सुरवातीला जायका चहा ते पिएमटी चौक भोसरी तसेच पिएमटी चौक भोसरी ते भोसरी ओव्हर ब्रिज जवळील अशोका हॉटेल पर्यंत जड अवजड वाहनांना ०८.०० ते १२.०० ते ५.०० ते ९.०० प्रवेश बंद
माई वडेवाले चौक से बनाचा ओढा तसेच बनाचा ओढा ते माई वडे वाले चौक जड/अवजड पाहनांना ०८.०० ते ११.०० आणि ५.०० ते ९.०० प्रवेश बंद
जय भारत चौक (वैशाली स्वीट सेंटर चीक) ते आनंदनगर कोसमॉस सोसायटी दरम्यान जड अवजड वाहनांना ०८.०० ते ११.०० आणि ५.०० ते ९.०० प्रवेश बंद
नाशिकफाटा चौक ते हॅरीस ब्रिज व हॅरीस ब्रिज ते नाशिकफाटा चौक दरम्यान सर्व प्रकारच्या जड / अवजड / ट्रव्हल्स बसेस यांना ०८.०० ते ११.०० व ५.०० ते ९.०० या दरम्यान प्रवेश बंद
हिंजवडी वाहतूक विभाग
वाकड ब्रिज वरुन व वाकड नाका येथुन इंडीयन ऑईल चौकाकडे जाण्यास सर्व प्रकारच्या जड / अवजड वाहनांना सकाळी ०८.०० ते १२.०० वाजेपर्यंत व सायंकाळी ५.०० ते १०.०० वाजेपर्यंत प्रवेश बंद
मुंबई बेंगलोर महामार्गावरुन मायकार शोरूम येथून डावीकडे वळुन हिंजवडी आयटी पार्क मध्ये जाण्यास सर्व प्रकारच्या जड / अवजड वाहनांना सकाळी ०८.०० ते ११.०० वाजेपर्यंत सायंकाळी ५.०० ते ९.०० वाजेपर्यंत प्रवेश बंद राजीव गांधी पूल -रक्षक चौक मार्गे काळेवाडी फाटा उड्डाणपुल व काळेवाडी फाटा उड्डाणपुल
सांगवी वाहतूक विभाग
रक्षक चौक मार्गे राजीव गांधी पूल या रस्त्यावर सकाळी ०८.०० ते ११.०० व सायं. ५.०० ते ९.०० या पर्यंत या वेळेत जड वाहनांना व ट्रॅव्हल्स बसेसला प्रवेश बंदी
काळेवाडी फाटा ते तापकीर चौक मार्गे एम. एम. चौक एम्पायर इंस्टेट या दरम्यानचे जाणा-या व येणाऱ्या रस्त्यावर सकाळी ०८.०० ते ११.०० व सायं. ५.०० ते ९.०० वा पर्यंत या वेळेत जड वाहनांना ट्रॅव्हल्स बसेसला प्रवेश बंदी
कस्पटे चौक ते सांगवी वाहतूक विभाग हद्दीतील सावित्रीबाई फुले चौक मार्गे शिवार चौक – कोकणे चौक मार्गे म्हसोबा चौक नाशिक फाटा कडे जाणा-या व येणाऱ्या रोडवर सकाळी ०८.०० ते ११.०० व ५.०० ते ९.०० वा. वा पर्यंत या वेळेत जड वाहनांना व ट्रॅव्हल्स बसेसला प्रवेशबंदी
म्हसोबा चौक मार्गे पिंपळे गुरवकडे जाणा-या दरम्यानचे रस्त्यावर व सांगवी फाटयाकडून सांगवी गावात जाणा-या दरम्यानचे रस्त्यावर सायंकाळी ५.०० ते ९.०० वा. पर्यंत या वेळेत जड वाहनांना प ट्रॅव्हल बसेसला प्रवेश बंद.
वाकड वाहतूक विभाग
वाकड नाका ते कस्पटे चौककडे जाणाऱ्या व येणाऱ्या मार्गावर जड वाहनांस प्रवेश बंद.
बिर्ला हॉस्पीटल ते भूमकर चौककडे जाणाऱ्या व येणाऱ्या मार्गावर जड वाहनांस प्रवेश बंद.
जिंजर हॉटेल येवून सर्विस रोडने भूमकर चौककडे येण्यास जड वाहनांस प्रवेश बंद
मायकार शोरूम येथून भुमकर चौककडे सर्विस रोड येण्यास जड वाहनांस प्रवेश बंद
शनिमंदिर येथून सर्व्हिस रोडने भूमकर चौककडे येण्यास जड वाहनांस प्रवेश बंद
जैगवार शोरूम येथून भूमकर चौककडे येण्यासजड वाहनांस प्रवेश बंद
वाकडगाव चौकाकडून दत्तमंदिर रोड वाकड कडे येण्यास जड वाहनांस प्रवेश बंद.
तापकीर चौक ते थेरगाव फाटा येथील थेरगाव मधील रोडला जड वाहनांस प्रवेश बंद.
वाकड वाहतूक विभाग हद्दीतील वरील मार्गावर जड/अवजड वाहनांना सकाळी ०७.०० ते ११.०० व ५.०० ते ९.०० वाजे दरम्यान प्रवेश बंद करण्यात येत आहे.
बावधन वाहतूक विभाग
सुसखिंड (सुसब्रिज) ते नांदे गाव व नांदे गाव ते सुसखिंड (सुसब्रिज) जाणे-येण्यास सकाळी ०८.०० ते ११.०० वाजे पर्यंत व ५.०० ते ९.०० वा चे दरम्यान जड / अवजड वाहनांना प्रवेश बंद करण्यात येत आहे.
पिंपरी वाहतूक विभाग
पिंपरी चौकाकडुन पिंपरी पुलावर आलेनंतर डावीकडे वळताना व शगुन चौकाकडे जाताना जड / अवजड वाहनांना सकाळी ०८.०० ते ११.०० व ५.०० ते ९.०० वाजे दरम्यान प्रवेश बंद करण्यात येत आहे.
भाटनगर कॉर्नर या ठिकाणी मेन बाजारामध्ये जाताना जड / अवजड वाहनांना सकाळी ०८.०० ते १२.०० व ५.०० ते ९.०० वाजे दरम्यान प्रवेश बंद करण्यात येत आहे.
शगुन चौक ते साई चौक आर्य समाज चौक ते कराची चौक, शगुन चौक ते डिलक्स चौक काळेवाडी पुलापर्यंत कराची चौक ते आंबेडकर रोड (रिव्हर रोड ) भाटनगर पर्यंत जड / अवजड वाहनांना सकाळी ०८.०० ते १२.०० व ५.०० ते ९.०० वाजे दरम्यान प्रवेश बंद करण्यात येत आहे.
साई चौक ते गेलार्ड चौक या रस्त्यावर जड / अवजड वाहनांना सकाळी ०८.०० ते ११.०० व ५.०० ते ९.०० वाजे दरम्यान प्रवेश बंद करण्यात येत आहे.
दिघी आळंदी वाहतूक विभाग
१. देहुफाटा चौक ते चाकण चौक दरम्यान जड / अवजड वाहनांना जाणे-येणेस सकाळी ०८.०० ते १.०० व १७.०० ते २१.०० वाजे दरम्यान प्रवेश बंद करण्यात येत आहे.
चाकण चौक ते वडगाव चौक दरम्यान जड / अवजड वाहनांना जाणे-येणेस सकाळी ०८.०० ते ११.०० १७.०० ते २१.०० वाजे दरम्यान प्रवेश बंद करण्यात येत आहे.
वडगाव चौक ते मरकळ चौक दरम्यान जड/अवजड वाहनांना जाणे-येणेस सकाळी ०८.०० ते ११.००. १७.०० ते २१.०० वाजे दरम्यान प्रवेश बंद करण्यात येत आहे.
मरकळ चौक ते फाटा दरम्यान जड / अवजड वाहनांना जाणे-येणेस सकाळी ०८.०० ते ११००४. मरकळ चौक ते देहुफाटा दरम्यान जड / अवजड वाहनांना जाणे-येणेस सकाळी ०८.०० ते ११.०० य १७.०० ते २१.०० वाजे दरम्यान प्रवेश बंद करण्यात येत आहे.
देहूरोड वाहतूक विभाग
स्वामी चौकातून देहूरोड बाजारात व सपाना चौकातुन देहुरोड बाजारात जड / अवजड वाहनांना सकाळी ०८.०० ते ११.०० व १७.०० ते २१.०० वा पर्यंत प्रवेश बंद.














