- सराईत आकाश राठोड टोळीवरही पोलिसांकडून मोका…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १३ जुलै २०२३) :- पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रातील १९ संघटीत गुन्हेगारी टोळ्यांमधील एकूण २०० आरोपींवर या वर्षात मोका कायद्याअंतर्गत पोलिसांनी कारवाई केली आहे. आजही पोलिसांनी आकाश वजीर राठोड टोळीवर मोका करावी केली आहे.
दिघी पोलीस ठाण्यात गु. रजि.नं. १९५/२०२३ भादंवि ३९२ ३४ च्या तपासासमध्ये आरोपी आकाश वजीर राठोड (वय २३ वर्षे, रा. एनळी वस्ती. मुलखेड कचरा डेपो शेजारी, गणेश तापकीर विट भट्टी जवळ, ता. मुळशी जि. पुणे) व इतर ०३ यांच्याविरुध्द चोरी, जबरी चोरी, असे एकुण ३० गंभीर गुन्हे पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय, अहमदनगर, पुणे ग्रामीणच्या हद्दित दाखल आहेत.
या टोळीमचील सर्व आरोपी यांनी संघटीत गुन्हेगारी टोळी बनवून हिंसाचाराचा वापर करून वर्चस्वासाठी व आर्थिक फायद्यासाठी संघटितपणे गुन्हे करीत असल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यांच्या विरुध्द महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम सन १९९९ अंतर्गत कारवाई करन्याबाबत प्रस्ताव पोलीस आयुक्त कार्यालय येथे सादर केला होता. या प्रस्तावामधील कागदपत्रांची छाननी करून नमूद गुन्ह्यांत महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम सन १९९९ चे कलम ३ (१) (ii). ३ (४) या कलमांचा अंतर्भाव करण्याचे आदेश वसंत परदेशी, अपर पोलीस आयुक्त पिंपरी चिंचवड यांनी पारीत केलेले आहेत.
हीकारवाई ही पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाचे पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे, पोलीस सह आयुक्त डॉ. संजय शिंदे, अपर पोलीस आयुक्त वसंत परदेशी, स्वप्ना गोरे, पोलीस उप-आयुक्त (गुन्हे), विवेक पाटील, पोलीस उप-आयुक्त परिमंडळ-०१ बाळासाहेब कोपनर, सहायक पोलीस आयुक्त गुन्हे १ यांचे मार्गदर्शनाखाली बाळकृष्ण सावंत, व.पो.नि. पी.सी.बी. गुन्हे शाखा मच्छिंद्र पंडीत, व.पो.नि. दिघी पोलीस ठाणे, तसेच अंमलदार पोलीस हवालदार सचिन चव्हाण, पो.हवा. व्यंकप्पा कारभारी पी.सी.बी. गुन्हे शाखा, पो. हवा. शरद विधु, दिघी पोलीस ठाणे, यांचे पथकाने केली आहे.














