न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १३ जुलै २०२३) :- २०५ चिंचवड विधानसभा मतदार संघ अंतर्गत मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) व पदनिर्देशीत अधिकारी (नोडल) यांची सकाळ व दुपार अशा दोन संत्रामध्ये पिंपरीत बैठक पार पडली.
या बैठकीमध्ये मतदार नोंदणी अधिकारी निलेश देशमुख, सहा. आयुक्त करसंकलन विभाग पिं.चिं. मनपा, अमोल कदम, तहसिलदार संजय गांधी योजना हवेली, अतिरीक्त सहा. मतदार नोंदणी अधिकारी तसेच नायब तहसिलदार श्चेता अल्हाट, सहा.आयुक्त उमेश ढाकणे ‘ह’ क्षेत्रिय कार्यालय, सहा. आयुक्त शितल वाकडे ‘ग’ क्षेत्रिय कार्यालय, सहा.आयुक्त किरणकुमार मोरे ‘ड’ क्षेत्रिय कार्यालय, सहा.आयुक्त अमित पंडीत ‘ब’ क्षेत्रिय कार्यालय, व सहा. मतदार नोंदणी अधिकारी यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली.
बैठकीमध्ये ०१.०१.२०२४ अर्हता दिनांकावर आधारित छायाचित्रासह मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम अंतर्गत ८० + मतदारांबाबत पडताळणी, मतदार यादीतील Blur Photo दुरुस्ती, मयत मतदार यांची नाव वगळणी, BLO App, Voter Help Line App, NVSP Portal संदर्भात माहिती, विशेष मोहिम या विषयावंर चर्च तसचे स्वीप कार्यक्रमांतर्गत वंचीत घटक, महिला, दिव्यांग, तृतीयपंथीय यासाठी विविध कार्यक्रम राबविण्याबाबत सुचना देण्यात आल्या. २०१९ अंतर्गत जिथे कमी मतदान झाले अशा मतमदान केंद्रावर जनजागृती करणेबाबत सूचना देण्यात आल्या व विशेष कार्यक्रम राबविणेबाबत सांगितले.