- आणखी एका तहसीलदारांची नियुक्ती; प्रथमच दोन तहसीलदार पाहणार तालुक्याचा कारभार…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १३ जुलै २०२३) :- मावळ तालुक्यातील ६० गावांसाठी अपर तहसीलदार अजित दिवटे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे आता नागरिकांची कामे जलद गतीने होण्यास मदत होणार आहे.
मावळ तालुक्यात एकूण १९० गावे आहेत. त्याचा भार एकाच तहसीलदारावर येत असल्याने तालुक्यातील ६० गावांसाठी अपर तहसीलदार अजित दिवटे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
गेल्या तीन महिन्यांपूर्वी तत्कालीन तहसीलदार मधुसूदन बर्गे यांचा कार्यकाल संपल्याने त्यांची बदली झाली होती. त्यांच्या जागी विक्रम देशमुख यांची नियुक्ती करण्यात आली आहे. अपर तहसीलदार अजित दिवटे यांच्याकडे १९० गावांपैकी काले काॅलनी व शिवणे मंडल विभागातील ६० गावांचा महसुली कारभार असणार आहे.