न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १४ जुलै २०२३) :- तातडीच्या दुरुस्तीच्या कामासाठी शनिवारी (दि. १५) रोजी सकाळी ९ ते सायंकाळी ५ पर्यंत पिंपरीतील वीज पुरवठा बंद राहणार आहे. यासंदर्भात महावितरणच्या वतीने वीज ग्राहकांना जाहीर सूचना देत कळविण्यात आले आहे.
महावितरणकडून देण्यात आलेल्या प्रसिद्धिपत्रकात म्हटले आहे की, पिंपरी शाखा अंतर्गत मधील पिंपरी कॅम्प भागातील पिंपरी कॅम्प २२ केव्ही उपकेंद्र येथे अत्यंत तातडीचे दुरुस्तीचे कामे करायची आहेत.
त्यामध्ये ब्रेकर पोल बदलणे, ब्रेकर सर्व्हिसिंग करणे, अपघात प्रवरण ठिकाणचे २२ केव्ही उपरी वाहिनीची दुरुस्ती करण्याकरिता पिंपरीगाव, वाघेरे आळी, माळी आळी, कुदळे कॉलनी, बी-ब्लॉक, सी-ब्लॉक, पिंपरी कॅम्प, पिंपरी मार्केट, भाटनगर, मिलिंदनगर, आदी ठिकाणचा वीजपुरवठा दुरुस्तीच्या कामासाठी बंद राहणार आहे. वीज ग्राहकांनी याची नोंद घ्यावी व महावितरण कंपनीस सहकार्य करावे, असे सर्व वीज ग्राहकांना कळविण्यात आले आहे.