- दिघी पोलीस ठाण्याच्या दोन पोलीस कर्मचाऱ्यांची धाडसी कामगिरी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १४ जुलै २०२३) :- संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज पालखी रथामध्ये असलेल्या पादुकांचे दर्शन घेण्यासाठी लाखोंच्या संख्येने भाविक जमा होत असतात. (दि. १२) रोजी संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज पालखी परतीच्या बंदोबस्ताच्या अनुषंगाने पोलिसांनी ठिकठिकाणी बंदोबस्त लावण्यात आला होता.
त्यावेळी संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराजांची पालखी वडमुखवाडी याठिकाणी आली. त्या ठिकाणी बंदोबस्ताकरिता नेमलेले दिघी पोलीस ठाण्याचे पोशि/३४०० रविंद्र पाठे व आरसीपी २ चे पोशि/३५२२३ राहुल कारंडे यांनी धाडस दाखविले.
माउलींच्या पादूकांचे दर्शन घेणाऱ्या महिलेला चालत्या रथाच्या चाकाखाली येण्यापासून वाचवले. पोलीस कर्मचारी पाठे यांचा पाय चाकाखाली येवून फ्रैक्चर झाला आहे. त्याचप्रमाणे कारंडे हे किरकोळ जखमी झालेले आहेत. महिलेला रथाच्या खाली येण्यापासून वाचविण्यात त्यांना यश आले आहे.
या दोन्हीही पोलीस कर्मचाऱ्यांना के के केअर हॉस्पिटल वडमुखवाडी येथे अॅडमीट केले. त्यानंतर पुढील उपचाराकरिता कारंडे यांना बिर्ला हॉस्पिटल येथे अॅडमीट करण्यात आले आहे.
या दोन्ही पोलीस कर्मचाऱ्यांच्या अतुलनीय कामगिरीची पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी स्वतः दखल घेवून त्यांना प्रत्येकी १०,००० रुप्यांची तातडीची मदत जाहीर केली आहे.