- पाच जणांच्या टोळक्याच्या विरोधात गुन्हा दाखल…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १४ जुलै २०२३) :- रुमच्या गॅलरीमध्ये उभे असताना चौघा आरोपींनी फिर्यादीला आवाज देऊन खाली बोलावुन घेतले. दारु पार्टीसाठी पैशांची मागणी करीत गाडी फोडण्याची धमकी दिली. फिर्यादी यांना हाताबुक्यांनी मारहाण करुन फिर्यादीच्या शर्टच्या खिशातुन ५०० रुपये जबरदस्तीने काढून घेऊन त्यांच्या स्विफ्ट डिझायरच्या डिक्कीचे नुकसान केले. तसेच फिर्यादी यांना मारण्यासाठी सह आरोपीने दगड फेकुन मारला. परंतु तो फिर्यादीने चुकविल्याने तो बाजुला उभ्या असणाऱ्या टाटा गाडीवर लागुन केबीनची काच फुटली. डाव्या बाजुच्या मिररची तोडफोड केली आहे, असे फिर्यादीत म्हटले आहे.
ही घटना (दि. १२) रोजी रात्री ११.०० वाजता विघ्नहर्ता मित्र मंडळ चौक, नेहरुनगर, पिंपरी येथे घडली. फिर्यादी इम्रान इमाम शेख यांनी आरोपी आकाश शंकर लष्करे (वय २५ वर्षे रा. साईबाबा मंदिराजवळ नेहरू नगर पिंपर), अंगद बळीराम कांबळे (वय ३८ वर्षे, रा. राजीव गांधी वसाहत, नेहरुनगर पिंपरी), शारुख नईम शेख (वय २६ वर्षे रा. वसंतदादा शाळे समोर भोसले चाळ नेहरूनगर, पिंपरी), दिनेश गोरख माने (वय २२ वर्षे रा. विटकर चाळ साईबाबा मंदिराजवळ नेहरू नगर पिंपरी) पुणे व आणखी एक अनोळखी इसमाच्या विरोधात फिर्याद दिली आहे.
पिंपरी पोलिसांनी ७२९ / २०२३ भा.द.वि कलम ३९५,४२७ प्रमाणे आरोपींवर गुन्हा दाखल केला आहे.