न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १४ जुलै २०२३) :- अशोक लिलॅन्ड ट्रकमधुन कर्नाटक ते काळेवाडी येथे मार्बल फरशी घेऊन जात असताना जगताप डेअरी चौकाजवळ, काळेवाडी येथे आरोपीने त्याच्या ताब्यातील ट्रक भरधाव वेगाने वाहतुकीच्या नियमांकडे दुर्लक्ष करुन चालवला.
फिर्यादीच्या भावास ट्रकमधुन खाली तोंडावर पाडुन, त्याला साधी व गंभीर दुखापत करुन त्याच्या मृत्यूस आरोपी कारणीभुत झाला आहे. हा प्रकार (दि. १०) रोजी सकाळी ११.०० च्या सुमारास घडला.
फिर्यादी नरेश राजप्पा म्हेत्रे यांनी आरोपी अशोक लिलॅन्ड ट्रकवरील चालक लक्ष्मण गणपती म्हेत्रे (वय ४८ वर्षे रा. मु.पो. हुलसुर ता. बसवकल्याण जिल्हा- बिदर, राज्य- कर्नाटक) याच्या विरोधात फिर्याद दिली आहे. वाकड पोलिसांनी ६६०/२०२३ भादंवि कलम २७९, ३३७, ३३८,३०४ (अ), मोटार वाहन कायदा कलम १८४ नुसार आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.