न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १४ जुलै २०२३) :- कपडयांच्या दुकाणात फिर्यादीच्या तोंड ओळखीचे तिघे आरोपी आले. त्यातील आरोपीने ‘येथे धंदा करायचा असेल तर आम्हाला हप्ते दयायचा, फुकट कपडे दयायचे’ असे बोलून शर्टच्या पाठीमागुन कोयता काढला. “तुला महित नाही का मी भोसरीचा भाई आहे, माझ्याकडे पैसे मागतोस” असे म्हणुन फिर्यादीचं अंगावर तो कोयता मारण्यासाठी उगारला असता फिर्यादी यांनी तो चुकविला.
हे पाहुन फिर्यादीचा भाऊ मध्ये येवु लागल्यावर आरोपी सोबत असलेल्या साथीदाराने फिर्यादीच्या दुकानातील खुर्ची उचलली. ”तु मध्ये आलास तर तुला मारुन टाकीन” अशी धमकी दिली व तिच खुर्ची फिर्यादी यांना फेकुन मारली.
तिसऱ्या साथीदाराने कपडयांची पिशवी फिर्यादीचे हातातुन ओढुन घेवुन “तुला लई माज आला आहे काय रे” असे म्हणुन रस्त्याने कोयता उगारत निघुन गेले. त्यावेळी फिर्यादीच्या दुकानातील लोक तसेच रस्त्याने येणारे जाणारे लोक त्यांच्या दहशतीला घाबरुन सैरावैरा पळु लागले व आजुबाजुच्या लोकांनी दुकानाचे शटर बंद करुन घेतले.
ही घटना (दि. १३) रोजी सायंकाळी ६.०० च्या सुमारास अॅटीटयूड मेन्स वेअर कपडयांचे दुकान, सखुबाई गवळी गार्डन जवळ, भोसरी येथे घडली. फिर्यादी रोशन श्रीकृष्ण सिंग यांनी आरोपी पिल्या राजे (वय अंदाजे २३ वर्ष), करण राठोड (वय अंदाजे २५ वर्ष), पत्या ऊर्फ प्रथमेश कांबळे (वय २० वर्ष अंदाजे सर्व रा भोसरी) यांच्या विरोधात फिर्याद दिली आहे.
भोसरी पोलिसांनी ५७८ / २०२३ भा.दं.वि. कलम ३८५, ३९२, ५०६ आर्म अॅक्ट ४ (२५). ३७(१) सह १३५ कि. लॉ अमेंडमेंट ३७ प्रमाणे गुन्हा दाखल करीत तिघांना ताब्यात घेतले आहे.