न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १६ जुलै २०२३) :- चाकण येथील मेदनकरवाडीतील बँक ऑफ महाराष्ट्र आणि माणिक चौकातील इंडीयन ओव्हरसीज या बँकांचे एटीएम फोडून एकाने पैसे लुटण्याचा पर्यंत केला आहे.
आरोपीने एटीएम मशीनचा चेस्ट डोअर दगडाच्या सहाय्याने फोडुन, तोडुन नुकसान करुन त्यामधील पैसे चोरण्याचा प्रयत्न केला आहे. याप्रकरणी एकाला पोलिसांनी अटक केली आहे.
मोहम्मद सरफराज कलामुद्दीन अन्सारी (वय २६ वर्षे, रा जमोरही जि रोहतास राज्य बिहार) असे अटक आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी त्याच्यावर चाकण पोलीस ठाण्यात ६०५,६०६/२०२३ भादवी कलम ४६१. ३८०, ४२७, ५११ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.














