न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १७ जुलै २०२३) :- त्रिवेणीनगर, तळवडे येथे वॉचमन म्हणुन कामावर असताना दुपारी ३.३० वाजताच्या सुमारास एका महीलेसह जेसीबी चालक आला. सोबत दहा ते बारा माणसे घेऊन येऊन बेकायदेशीर जमाव जमवला.
फिर्यादी यांच्या मालकीचे गट नं. १६४ त्रिवेणीनगर येथील जागेचे पत्र्याचे कंपाऊंड व लोखंडी चॅनेल जेसीबीच्या सहाय्याने तोडुन जागेवर अतिक्रमण केले. कंपाऊडच्या पत्र्याचे व लोखंडी चॅनेलचे नुकसान केले. फिर्यादीला शिवीगाळ करुन जेसीबी अंगावर घालुन ‘तुला मारुन टाकीन’ अशी धमकी दिली. ही घटना (दि. १६) रोजी दुपारी ३.३० वाजता मालक गंगाधर भालेकर यांच्या मालकीचे गट नं. १६४, त्रिवेणीनगर, तळवडे येथे घडली.
फिर्यादी शैलेश महादेव शिंदे यांनी आरोपी जेसीबीवरील चालक, एक अनोळखी महिला व दहा ते बारा अनोळखी इसम यांच्या विरोधात फिर्याद दिली आहे. चिखली पोलिसांनी ४४४/२०२३ भा.द.वि. कलम १४१, १४३, १४९, ४४७, ४२७, ५०४, ५०६ अन्वये आरोपींच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.















