न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १७ जुलै २०२३) :- रिक्षासाठी १५० रूपये भाडे ठरलेले होते. प्रवासा दरम्यान फिर्यादी या आरोपीच्या रिक्षातुन उतरल्यावर फिर्यादीने आरोपी यांना १०० रूपयांच्या दोन नोटा दिल्या. आरोपीने फिर्यादी यांना ५० रूपये परत करण्यास नकार दिला. फिर्यादीसोबत वाद घालुन फिर्यादी यांना ‘जा तुला पैसे देत नाही, काय करायचे आहे ते कर’ असे म्हणुन ‘तुझ्या बापाचे पैसे नाहीत’ असे म्हणुन शिवीगाळ करत केली.
फिर्यादी यांच्या अंगावर रागात धावुन येवुन फिर्यादी यांना मारण्यासाठी हात उगरला. फिर्यादी या आरोपीस घाबरून साहित्य घेवुन घराकडे जाण्यासाठी निघत असताना त्याने फिर्यादी यांना रस्त्यावर थांबवुन त्यांचा रस्ता अडवुन दमदाटी केली, असे फिर्यादीत म्हटले आहे. ही घटना (दि १६) रोजी पहाटे ५.३५ वाजताच्या सुमारास यश्वीन एनकोअर सोसायटी, टीप-टॉप हॉटेल पाठीमागे, वाकड येथे घडली.
महीला फिर्यादीने निष्पन्न आरोपी भास्कर अंबादास गायकवाड (वय ६० वर्षे धंदा-रिक्षा चालक, रा. बो-हाडेवाडी, मोशी) याच्या विरोधात फिर्याद दिली आहे. हिंजवडी पोलिसांनी ७९९/२०२३ भादवि कलम ३४१, ३५२, ५०४, ५०६ नुसार गुन्हा दाखल करीत आरोपीला अटक केली आहे.














