न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ३१ मार्च) :- माणुसकी हा शब्द सध्या विरळच होत चालेलला आहे. रस्त्यावर एखादा मनुष्य पाण्यासाठी विव्हळत पडलेला दिसला, तरी संवेदनाहीन मनुष्य त्या व्यक्तीला पाणी पाजण्यासाठी देखील धजावत नाहीत. तर मदत करणे विरळच. परंतु, माजी नगरसेवक व शिवसेनेचे जितेंद्र ननावरे यांनी आपल्या माणुसकीचे दर्शन घडवत, एका असहाय वृद्धेची व तिच्या पुत्राची आस्थेने विचारपूस करीत, प्रसंगी आर्थिक मदतीची देखील तयारी दर्शविली.
याबाबत घडलेला प्रसंग सांगताना ननावरे म्हणाले की, ”सकाळी ११ ची वेळ होती. वायसीएम रुग्णालय येथे रुग्णास भेट देऊन, मुलाचा शाळेचा निकाल असल्याने जायचे होते. त्यामुळे धावपळ करत शाळेत जायला निघालो. रुग्णालयात चौथ्या मजल्याशेजारी लिफ्टजवळ आलो असताना एक वयोवृद्ध महिला हातात मोठा लठ्ठ कागदाचा गट्टा घेऊन धाय मोकलून रडत होती. प्रथमतः दुर्लक्षच केल. कारण वाटल की रुग्णालयात सर्वाना दुखःच असत. पण खूप वेळ झाला, तरी ती महिला रडायचं काय थाबंत नव्हती. शेवटी मला राहवले नाही आणि विचारल मावशे काय झाल ग, का रडते?
मावशीच्या तोंडातून शब्दच फुटत नव्हता. मग माझ्या पत्नी जवळची पाण्याची बाटली दिली. पाणी पिल्यानंतर मावशी शांत झाली. पुन्हा विचारले काय झाले. मग मावशी बोलती झाली. मी विदर्भातली माझा लेक गावाकडं दुष्काळ असल्याने काम धंदा नाही. कामासाठी जुन्नरला दोनच दिवस झाल आलता. रात्री कामावरून येताना कोणतीतरी गाडी उडवून गेली. त्याला लोकांनी या दवाखान्यात भरती केल. पोलीसानी मला कळवलं. माझ्या जवळ फक्त यायचे पुरतील एवढच पैक (पैसे) घेऊन मी आले. पोराची मांडी मोडली. एकुलत एक पोरग. नातेवाईक पुण्यात कुणीच नाही. डाक्टर रगत आणायला सांगत्यात. रूपया जवळ नाही, असे सांगत शेवटी जे सांगितल माझ्या काळजाचा थरकाप उडला. काल एका बाईनी आरधी भाकर दिली. ती मी आणि लेकान चतकोर चतकोर खाल्ली. आज लेकाला आणि मला काय खायला नाही. याचा विचार करून, रडायला आल. हे सांगताच न कळत माझे डोळे पाणावले.
ठरवल… मावशीची पहिली जेवण्याची व्यवस्था करायची. मी मावशीला चौथ्या मजल्या वरून खाली घेऊन आलो. पहिलं तिला सांगितल, तु काळजी करू नको मी आहे. सगळ काही बघतो. मावशीला हॉस्पिटलमध्ये माझे मित्र सामजिक कार्यकर्ते हुसैन यांच्याकडे घेऊन गेलो आणि सत्य परिस्थिती सांगितली. हुसैन यांना सांगितल यांच्या जेवण्याची व्यवस्था करा. लागतील ते पैसे मी देतो. सगळी परिस्थिती ऐकल्यावर हुसैन देखील जेवणासोबत ऑपरेशनला लागेल ते रक्त प्लेट्लेट देण्याच कबूल केल. मावशीला म्हणालो तु आत्ता काळजी करू नको. ऑपरेशनला लागणार साहित्य त्यासाठी मी पैसे गोळा करून देतो. घाबरायचं नाही मी तुझ्या सोबत आहे. मावशीला काहीच सुचना. मावशी पुन्हा धाय मोकलून रडू लागली आणि म्हणाली पांडुरंगा तु हाय, आणि माझ्या पाया पडायला झुकणार तेवढ्यात म्हातारीला खांद्याला धरल. मी पण लेक तुझा. माझ्या कशाला पाया पडतीस.
शेवटी मावशीन विचारल तुझ नाव काय लेका आणि माझा ऊर अभिमानाने भरून आला. शेवटी बाळासाहेबांचे वाक्य आठवलं, आडल्या नडल्याला मदत करा”. जितेंद्र ननावरे यांनी दाखवलेल्या सहानुभूतीमुळे निश्चितच त्या म्हताऱ्या आजीला मोठा आधार मिळाला आहे. त्यामुळे निश्चितच अजूनही माणुसकी जिवंत असल्याचे या घटनेमुळे दिसून येते. ननावरे यांच्या सहानुभूतीची प्रभागातील नागरिकांमध्ये समाधानकारक चर्चा आहे.










