- त्याचा असा आहे अर्थ, वाचा…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २० जुलै २०२३) :- विविध प्रकारच्या जाहिरातींचे लघुसंदेश मोबाईल फोनवर येत असतात. मात्र आज सकाळी १०.२० ते १०.३० दरम्यान आज असंख्य स्मार्टफोन ‘व्हायब्रेट’ होऊन त्यावर एक संदेश दिसला. त्यामुळे एकाएकी असे का झाले, असा प्रश्न अनेकांना पडला आहे. त्याबाबत अनेकांनी समाजमाध्यमांत पोस्ट करून प्रश्न विचारले आहेत. मात्र केंद्रीय तंत्रज्ञान मंत्रालयाकडून ही तातडीची चाचणी केली जात असल्याची चर्चा आहे.
तंत्रज्ञानाचा वापर करून नागरिकांना जागरूक करणे शक्य आहे. त्यामुळे सरकारकडून अनेकदा नैसर्गिक आपत्तीविषयी लघुसंदेश पाठवून सूचना दिली जाते. मात्र सर्व नागरिक ते संदेश गांभीर्याने घेत नाहीत. त्यामुळे एकाचवेळी अनेकांना असे इमर्जन्सी अलर्ट पाठवण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे.
आणीबाणीच्या परिस्थितीत, किंवा एखाद्या मोठ्या आपत्तीवेळी सर्व नागरिकांना एकाच वेळी सूचना देता यावी, यासाठी सरकारने एक यंत्रणा तयार केली आहे. या नोटिफिकेशनच्या माध्यमातून त्याचीच चाचणी घेण्यात आली. मग ठराविक लोकांनाच हे नोटिफिकेशन मिळालं, आणि बाकीच्यांना नाही – असं का?
फोनमधील सेटिंग असू शकतं कारण…
तुम्हाला जर हा इमर्जन्सी अलर्ट आला नसेल, तर तुमच्या फोनमधील एक सेटिंग बंद आहे का हे तपासणं गरजेचं आहे. फोनमधील ‘Wireless Emergency Alerts’ ही सेटिंग बंद असल्यास, तुम्हाला भविष्यात देखील अशा प्रकारच्या धोक्याच्या सूचना मिळू शकणार नाहीत.
अशी बदला सेटिंग
इमर्जन्सी अलर्ट सेटिंग सुरू करण्यासाठी तुम्हाला सर्वात आधी फोनच्या सेटिंग्समध्ये जावं लागेल. त्यानंतर स्क्रोल डाऊन करून सेफ्टी अँड इमर्जन्सी हा पर्याय शोधा.यामध्ये गेल्यानंतर पुन्हा स्क्रोल डाऊन करून ‘Wireless Emergency Alerts’ हा पर्याय निवडा. याठिकाणी Allow Alerts हा पर्याय तुम्हाला बंद दिसेल. याच्या टॉगलवर टॅप करून हा पर्याय सुरू करा. यानंतर तुम्हाला वेळोवेळी इमर्जन्सी अलर्ट मिळतील.
अलर्ट फीचर अनिवार्य
केंद्र सरकारने यापूर्वीच मोबाईल कंपन्यांना आपल्या स्मार्टफोनमध्ये हे इमर्जन्सी अलर्ट फीचर देणं अनिवार्य केलं आहे. सरकारच्या आदेशानंतर देखील आपल्या फोनमध्ये इमर्जन्सी अलर्ट फीचर न देणाऱ्या कंपन्यांवर कारवाई करण्यात येणार असल्याचं एप्रिल महिन्यात सांगण्यात आलं होतं. यासाठी सरकारने कंपन्यांना सहा महिन्यांची मुदत दिली होती.














