न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी चिंचवड (दि. २१ जून २०२६) :- पिंपळे सौदागर येथील शिवछत्रपती लिनिअर अर्बन गार्डन येथे आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त सामूहिक योग व प्राणायाम शिबिर उत्साहात पार पडले.
भारतीय जनता पार्टी रहाटणी-पिंपळे सौदागर आणि ‘द आर्ट ऑफ लिविंग’ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कार्यक्रमात नागरिकांनी भजनाच्या ठेक्यावर योगसाधनेचा ध्यास घेतला. ‘द आर्ट ऑफ लिविंग’चे सत्यजित भैया यांनी योग, प्राणायाम व निरोगी जीवनशैलीबाबत मार्गदर्शन केले.
यावेळी भाजप शहराध्यक्ष तथा नगरसेवक शत्रुघ्न (बापू) काटे, नगरसेविका कुंदाताई भिसे, नगरसेविका अनिताताई काटे, पवना सहकारी बँकेचे संचालक जयनाथ काटे, समाजसेवक संदेश काटे पाटील, संजयशेठ भिसे, संदिपशेठ काटे, दिनेश काटे पाटील, मनोजराव ब्राम्हणकर, अमित मगर, राजेश पाटील, सुप्रिया पाटील, प्रविणशेठ कुंजीर, बाळकृष्ण परघळे, दिपक गांगुर्डे, समीर देवरे, विजय पाटील, शितल पटेल आदी मान्यवर उपस्थित होते.














