न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २२ जुलै २०२३) :- पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या क क्षेत्रिय आरोग्य कार्यालयाच्या वतीने डेंगूबाबत नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात येत आहे. डास उत्पत्ती करणाऱ्या आस्थापनांवर दंडात्मक कारवाई करून सुमारे २९ हजार पाचशे रुपयांचा दंड करण्यात आला.
सहाय्यक आयुक्त अण्णा बोदडे यांच्या नेतृत्वाखाली सहाय्यक आरोग्य अधिकारी तानाजी दाते आरोग्य निरीक्षक राजेंद्र उज्जैनवाल वैभव घोळवे, क्षितिज रोकडे विक्रम सौदायी, यांनी ही कारवाई केली.
जाधव वाडी चिखली, कुदळवाडी नेहरूनगर आदी परिसरात डास उत्पत्ती करणाऱ्या आस्थापनांची पाहणी करण्यात आली. सुमारे ५० आस्थापनांची तपासणी या मोहिमेत करण्यात आली.















