- एकाची रोकड लुटली; पोलिसांकडून टोळी जेरबंद…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २३ जुलै २०२३) :- गाडी रस्त्यावर आडवी लावुन हातात दगड घेवुन आरोपींनी रोडवर दहशत केली. पैशांची मागणी करुन व शिवीगाळ केली. फिर्यादीच्या खिशातील २०० रुपये जबरदस्तीने काढुन फिर्यादीच्या वॅगनर गाडीवर दगड मारुन मागील बाजुचे नुकसान केले.
हा प्रकार (दि. २२) रोजी पहाटे ३.०० च्या सुमारास शास्त्री चौक, भोसरी-आळंदी रोड, भोसरी येथे घडला. फिर्यादी नितिन चंद्रकांत कांबळे यांनी आरोपी अविनाश नरेश गायकवाड (वय अंदाजे १८ वर्षे, रा. काळे कॉलनी आळंदी), दिनेश मधुकर वाघमारे (रा. राममंदीर कॉलनी, चक्रपाणी वसाहत, भोसरी), पियुश कांबळे (वय अंदाजे १८ ते २० वर्षे, रा. विश्रांतवाडी), अजय (वय अंदाजे १८ ते २० वर्षे त्याचा पुर्ण नाव पत्ता माहीत नाही) यांच्या विरोधात फिर्याद दिली आहे.
भोसरी पोलिसांनी ६०१/२०२३ भा.दं.वि कलम ३९२, ३४, ५०४, क्रिमीनल लॉ अमेंडमेंट ३, ७ प्रमाणे आरोपींवर गुन्हा दाखल करीत त्यांना अटक केली आहे. घटनेचा पुढील तपास पोउपनि केंद्रे हे करीत आहेत.















