न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २३ जुलै २०२३) :- लग्नाचे अमिष दाखवून फिर्यादीच्या इच्छेविरुध्द वेळोवेळी शारीरीक संबंध प्रस्थापित केले. फिर्यादी महिलेला शारीरीक व मानसिक त्रास दिला. त्यांचे दोघांचे फोटो व्हायरल करण्याची धमकी दिली, असे फिर्यादीत नमूद आहे.
हा प्रकार सन २०१६ ते आजपर्यंत चाकण येथे घडला. महीला फिर्यादी यांनी आरोपी गणेश रामदास खराडे (वय २९ वर्ष, धंदा-बिल्डर, चाकण) याच्या विरोधात फिर्याद दिली आहे.
चाकण पोलिसांनी ६१८/२०२३ भादवि कलम ३७६ (२) (), ५०४, ५०६, ३२३ अन्वये गुन्हा दाखल करीत आरोपीला अटक केली आहे. घटनेचा पुढील तपास पोउपनि डेरे हे करीत आहेत.














