न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २३ जुलै २०२३) :- राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पार्टी, पिंपरी-चिंचवड शहर जिल्ह्याच्या वतीने भाजपा शहराध्यक्ष शंकर जगताप यांच्या पुढाकारातून “सेवाकार्याचे आयोजन करण्यात आले आहे.
त्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक २२ मधील छत्रपती शिवाजी चौक, एमएम शाळेजवळ आणि परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. या अभियानात प्रभाग क्रमांक २२ मधील भाजपचे सर्व पदाधिकारी, कैलास सानप सरचिटणीस भारतीय जनता पक्ष पिंपरी चिंचवड शहर जिल्हा ओबीसी मोर्चा, काळुराम नढे जिल्हा नियोजन समिती सदस्य, सोमनाथ तापकीर, विनोद तापकीर, प्रमोद ताम्हणकर, दिलीप आंब्रे, धर्मा पवार, संजय गायके, दिपेश आंब्रे, आकाश भारती, राजु शिंदे, अतुल नढे, डाॅ. शिंदे, सुहास सुतार आदी सहभागी झाले होते.














