- भांबोलीतील घटना; महाळुंगे एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २३ जुलै २०२३) :- भांबोली येथील गोडावूनमधुन सीएस किराड ट्रान्सपोर्ट या ट्रान्सपोर्टच्या ट्रकमध्ये महालक्ष्मी महीला गृह उदयोग आणि बाल विकास बहुउदेशीय इंडस्ट्रीयल कॉ ऑपरेटीव्ह सोसायटी लि. या कंपनीच्या गव्हाच्या ५० किलोच्या ५४० गोण्या ट्रकमध्ये भरुन वजन करण्याकरीता सावरदरी येथील फिर्यादीच्या कंपनीत धान्य घेवुन जाण्यासाठी फिर्यादीने विश्वासाने ट्रक आरोपी चालकाच्या ताब्यात दिला होता.
आरोपीने धान्याचा ट्रक रोडच्या बाजुला लावला. ट्रकमधुन आरोपी चालकाने १६,००० रुपये किमतीच्या गव्हाच्या ५० किलो वजनाच्या १० गोण्या अपहार करण्याच्या उददेशाने पिकअप गाडीमध्ये टाकत असताना फिर्यादीला मिळून आला. हा प्रकार (दि. २१) रोजी सायंकाळी ५.२० च्या सुमारास सावरदरी गावच्या हद्दीत, शिवम हॉटेलसमोर, भांबोली फाटा ते एचपी चौक, रस्त्याच्या बाजुला ता. खेड जि. पुणे येथे घडला.
फिर्यादी शिवेश श्यामबिहारी सिंह (मेदनकरवाडी, चाकण) यांनी आरोपी अन्वर लतीफ शेख (वय ४५ वर्षे रा. येवलेवाडी, काञज), पिकअप गाडीवरील चालक (नाव पत्ता माहीत नाही) यांच्या विरोधात फिर्याद दिली आहे. महाळुंगे एमआयडीसी पोलिसांनी ४१९/२०२३ भा.द.वि कलम ४०६,५११ नुसार आरोपीवर गुन्हा दाखल केला आहे. मपोउपनि चव्हाण हे घटनेचा पुढील तपास करीत आहेत.














