- सहा जणांवर भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २४ जून २०२३) :- जुन्या भांडणाच्या कारणावरुन आरोपीने फिर्यादीच्या मित्राला आई-बहिणीवरुन शिवीगाळ करत लाथाबुक्यांनी मारहाण केली. त्याच्या जवळील कोयता काढला व फिर्यादीच्या मित्राच्या डोक्यात मारला. तसेच त्याच्या छातीवर, पाठीवर सपासप वार केले. तसेच सह आरोपी तिघांनी फिर्यादीच्या मित्राला पकडून लाथाबुक्यांनी मारहाण केली. त्यावेळी सहआरोपीने बियरची बॉटल फोडली व पाठीत जोरात खुपसली. तसेच सह आरोपीने काटा चमच्याने फिर्यादीच्या मित्राच्या शरीरावर सपासप वार करुन त्यामधून रक्त येवून गंभीर जखमी केले व फिर्यादी यांना सुध्दा शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी मारहाण केली आहे.
ही घटना (दि. २२) रोजी रात्री १०.३० च्या सुमारास धावडेवस्ती, भोसरी येथे घडली. फिर्यादी आकाश संजय ठोंबरे (वय २० वर्षे, चक्रपाणी वसाहत, भोसरी), विधीसंघर्षित बालक, गणेश कृष्णा गवारे (वय अंदाजे १९ वर्षे रा. चक्रपाणी वसाहत, भोसरी), विधीसंघर्षित बालक, विधीसंघर्षित बालक, विधीसंघर्षित बालक, विधीसंघर्षित बालक यांच्या विरोधात फिर्याद दिली आहे.
भोसरी पोलिसांनी आरोपींवर ६०६ / २०२३ भा.दं.वि. कलम ३०७,१४३, १४८, १४९, ३४ मुंबई पोलीस अधिनियम ३७ (१) (३), भारतीय हत्यार कायदा कलम ४ (२५) प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. पोउपनि भवारी हे घटनेचा पुढील तपास करीत आहेत.














