- तरुणीची फसवणूक करीत केला परस्पर दुसरीशी विवाह…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २४ जून २०२३) :- विवाहसाठी महिला फिर्यादीने जीवन साथीवर प्रोफाईल रजिस्टर केली होती. आरोपीने फिर्यादीला जीवन साथीवर रिक्वेस्ट पाठवुन विवाहासाठी होकार दिला. फिर्यादीला भेटण्यासाठी बोलाविले. दरम्यान फिर्यादीशी आरोपीने सहमतीशिवाय जबरदस्तीने शारिरीक संबंध व अनैसर्गीक संबंध केले. त्यानंतर फिर्यादीला आरोपीने ‘मी तुझ्याशी लग्न करतो’ असे वचन देवुन तिच्याशी वारंवार शारिरीक संबंध प्रस्थापित केले. फिर्यादीला काही एक माहिती न देता दुस-या मुलीशी विवाह करुन फिर्यादीची फसवणुक केली.
याबाबत जाब विचारण्यासाठी फिर्यादी या भावासह आरोपीच्या घरी गेल्या असता आरोपीने फिर्यादीला ‘तुला काय करायचे ते कर’ असे म्हणुन शिवीगाळ करून हकलून दिले, असे फिर्यादीत म्हटले आहे. हा प्रकार (दि. १४/१०/२०२१ ते दि. १९/१२/२०२१) दरम्यान हिंजवडी व हॉटेल वाशी येथे घडला.
महिला फिर्यादीने आरोपी आविनाश शिवाजी पाटील (वय ३१ वर्षे, रा कौलव, ता राधानगरी, जि कोल्हापुर) याच्या विरोधात फिर्याद दिली आहे. हिंजवडी पोलिसांनी ८१९/२०२३ भा.द.वि.क ३७६ (२) (एन), ३७७, ५०४ प्रमाणे आरोपीवर गुन्हा दाखल केला आहे. घटनेचा पुढील तपास मपोउपनि बोरकर हे करीत आहेत.














