न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २४ जून २०२३) :- गोडावुनचे शटर उचकटुन अज्ञात चोरट्याने आत प्रवेश केला. गोडाऊनमधील २५,१०,०८० रूपये किंमतीचे वेगवेगळ्या प्रकारचे एलईडी टिव्ही चोरून नेले आहेत.
ही घटना (दि. २२) रोजी ९.०० ते (दि. २३) रोजी सकाळी १०.०० च्या दरम्यान एम आर सुर्या इलेक्ट्रॉनिक्स इंडीया प्रा. लि., हॉटेल महेंन्द्रा गार्ड शेजारी, बरगेवस्ती, कुरुळी ता. खेड येथे घडली.
फिर्यादी गोविंदराम रत्नलाल माळी यांनी अज्ञात इसमाच्या विरोधात फिर्याद दिली आहे. महाळुंगे पोलिसांनी ४२७ / २०२३ भा.व.वी. कलम ४६१.३८० प्रमाणे अज्ञात आरोपीवर गुन्हा दाखल केला आहे. पोउपनि गायकवाड हे घटनेचा पुढील तपास करीत आहेत.


















