- चऱ्होलीत महिलेला मारहाण करीत गळा दाबला…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २४ जून २०२३) :- कशाला साफसफाई करते, ही जागा तुझ्या बापाची आहे का?, असे म्हणुन फिर्यादीला त्रास देण्याच्या उदेशाने फिर्यादी राहत असलेल्या ठिकाणी साफसफाई करताना त्यांना आरोपीने थांबून ठेवले. लाकूड घेवून फिर्यादीच्या उजव्या पायाच्या नडगीवर मारले. तुला मारुनच टाकेन, तुला राहु देणार नाही, अशी आरोपीने धमकी दिली. त्यावेळी फिर्यादी यांनी त्याला ढकलले. आरोपीने एका हाताने फिर्यादी यांचा गळा पकडुन दुसऱ्या हाताने डाव्या गालावर कानसुळात मारली. फिर्यादी यांनी पोलीसांना कॉल केला असता तो त्या ठिकाणावरुण पळुन गेला, असे फिर्यादी म्हटले आहे.
हा प्रकार (दि. २३) रोजी सायंकाळी ५.०० च्या सुमारास कर्मविर सोसायटी, बुध्द विहारासमोर, माळी पेठा, च-होली, ता. हवेली येथे घडला. महिला फिर्यादीने आरोपी अनिल रासकर (वय अंदाजे ४८ वर्षे, रा. कर्मविर सोसायटी बुध्द विहारासमोर, माळी पेठा च-होली बु. ता. हवेली) याच्या विरोधात फिर्याद दिली आहे.
दिघी पोलिसांनी आरोपीच्या विरोधात ३२३/२०२३ भा.द.वि. कलम ३२४, ४४७, ३२३, ५०६, ५०४, प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोउपनि शिखरे करीत आहेत.














