न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २५ जुलै २०२३) :- वै. हभप पांडुरंग काटे प्रतिष्ठान संचलित पी. के. इंटरनॅशनल स्कूल अॅण्ड जुनियर कॉलेजमध्ये बाळ गंगाधर टिळक यांची जयंती साजरी करण्यात आली.
शाळेचे संस्थापक जगन्नाथ काटे यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला. प्राचार्या धनश्री सोनवणे यांनी लोकमान्य टिळक यांच्या कार्यकाळाची माहिती सांगितली. विद्यार्थ्यांनी देखील बाळ गंगाधर टिळक यांच्या जयंतीनिमित्त मनोगत व्यक्त केली. शिक्षकांनी देखील टिळकांच्या सामाजिक कार्याचा आढावा विद्यार्थ्यांना देत त्यांचे समाजकार्य आपल्या देशासाठी किती मौल्यवान ठरले, याची जाणीव करून दिली.
या कार्यक्रमास विद्यार्थी, सर्व शिक्षकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी आदी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुषमा निखाडे यांनी केले. तर आभार मंजुषा रेडेकर यांनी मानले.












