- भोसरीतील कंपनीमधून चोरी झालेला मुद्देमाल हस्तगत…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २५ जुलै २०२३) :- एमआयडीसी भोसरी पोलीसांनी परीसरात रात्रीच्या वेळी घरफोडी करणाऱ्या चोरटयास जेरबंद केले आहे. अमिर ऊर्फ चप्या हुसेन शेख (वय ३० वर्षे, रा. लिंक रोड, पत्राशेड झोपडपट्टी, चिंचवड, सध्या रा. बालाजीनगर झोपडपट्टी. एमआयडीसी, भोसरी) असे अटक आरोपीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एमआयडीसी भोसरीतील मरक्युरस वॉटर ट्रिटमेंट कंपनीत (दि. १६) रोजी पहाटे ३.०० च्या सुमारास अज्ञात चोरटयांनी मटेरिअलची चोरी केल्याबाबत (दि. १८) रोजी एम.आय.डी.सी भोसरी पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता. तपासादरम्यान पोलिसांनी आजुबाजुचे सीसीटीव्हीची पहाणी केली. दरम्यान आरोपीबाबत गोपनिय माहिती पोलिसांना मिळाली. रेकॉर्डवरील आरोपी अमिर याला पोलिसांनी ताब्यात घेतले. सदरचा गुन्हा हा त्याने त्याच्या दोन विधीसंघर्षीत साथीदारांसह केला असल्याचे त्याने सांगितले. अटक आरोपीची पोलीस कोठडी घेवुन त्याच्याकडुन गुन्हयातील चोरीस गेलेला १,५०,००० रुपये किंमतीचा मुद्देमाल व चोरीस गेलेली १२,००० रुपये किंमतीची पालीकेब वायर असा एकुण १,६२,००० रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
आरोपीने एमआयडीसी भोसरी पोलीस स्टेशन ह्द्दीत गुन्हा रजि. नं. ३०५ / २०२३ भा.दं.वि. कलम ३८०, ४५७, ३४: व गु.र.न. १८३/२०२३ भा.दं.वि. कलम ३८०, ४५४, ४५७ प्रमाणे गुन्हे केले असल्याचे निष्पन्न झाले आहे. गुन्हयाचा पुढील तपास पोलीस उप निरीक्षक सचिन चव्हाण, एम.आय.डी.सी भोसरी पोलीस स्टेशन हे करत आहेत.
सदरची कारवाई विनयकुमार चौबे पोलीस आयुक्त, डॉ. संजय शिंदे सह पोलीस आयुक्त, वसंत परदेशी अप्पर पोलीस आयुक्त, विवेक पाटील पोलीस उपायुक्त, परिमंडळ १, सतिश कसबे सहा. पोलीस आयुक्त, पिंपरी विभाग यांच्या सुचना व मार्गदर्शनानुसार राजेंद्र निकाळजे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, सचिन चव्हाण, पोलीस उपनिरीक्षक पोलीस अंमलदार चंद्रकांत गवारी, संजय जरे, स्वप्नील शेलार, गणेश बोऱ्हाडे, शरद गांधिले, राहुल लोखंडे, भागवत शेप, नितीन खेसे, अनिल जोशी, विशाल काळे, महीला पोलीस अंमलदार उषा होले यांनी मिळुन केली आहे.












