न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २७ जुलै २०२३) :- प्रभाग क्र. २३ मध्ये ‘ग’ क्षेत्रिय कार्यालयाच्या वतीने डेंग्यू आळी सर्वेक्षण मोहीम राबविण्यात आली. त्या अंतर्गत भंगार दुकानांना नोटिस दिल्या असून एकून दहा हजार रुपयांची दंडात्मक कारवाई करण्यात आली.
क्षेत्रिय अधिकारी वाकडे, सहा आरोग्याधिकारी दरवडे, मुख्य आरोग्य निरीक्षक वसंत सरोदे यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य निरीक्षक इंगेवाड व आरोग्य मुकादम झेंडे भाऊसाहेब, आरोग्य कर्मचारी यादव, मंडलिक, बारणे यांनी कारवाई केली.















