न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २७ जुलै २०२३) :- कामाला जाताना दोघा आरोपींनी फिर्यादी महिलेला रस्त्यात आडवले. ‘तु आम्हाला खुप आवडते, तु आमच्याशी बोलत नाही, तर निदान तुझा मोबाईल नंबर तरी दे’ असे फिर्यादीला म्हणाले. तसेच फिर्यादीच्या राहत्या घरी दारु पिऊन ‘ आम्ही दोघे तुझ्या घरी येऊन तुझ्या घराचा दरवाजा वाजवतो, हे तु माझी पत्नी कोमलला का सांगितले, ही गोष्ट आपल्या तिघातच ठेवायची होती ना, असे म्हणत आरोपीने फिर्यादीचा डावा हात पिरगुळुन हातावर ब्लेडने मारुन जखमी केले. सह आरोपीने फिर्यादीच्या डाव्या हातास धरुन अंगावरील कुर्ती ओढुन फाडुन फिर्यादीच्या मनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य करुन फिर्यादीचा विनयभंग केला, असे फिर्यादीत म्हटले आहे.
हा प्रकार (दि. २४) रोजी ११.०० वाजता, (दि.२६) रोजी सकाळी ९.३० वाजता मरीआई मंदीरा पाठीमागे, आनंदनगर झोपडपट्टी, चिंचवड येथे घडला.
महिला फिर्यादी यांनी नाना जालिंदर गायकवाड, दादा पारस खवळे यांच्या विरोधात फिर्याद दिली आहे. चिंचवड पोलिसांनी ३३०/२०२३, भादवी कलम ३५४, २२४, ३२३, ३४ नुसार गुन्हा दाखल केला आहे. घटनेचा पुढील तपास पोउपनि चव्हाण हे करीत आहेत.















