न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २७ जुलै २०२३) :- पिंपरी चिंचवड, पुणे शहर आणि पुणे ग्रामीण पोलीस हद्दीतून दोन वर्षांसाठी हद्दपार केले असता तडीपार आदेशाचा भंग करुन आरोपी पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रात आला. कोणतेही घातक शस्त्र जवळ बाळगण्यास मनाई आदेश असताना आदेशाचा भंग करुन आरोपीने त्याचे ताब्यात सत्तुर जवळ बाळगला.
पोलिसांच्या गुन्हे शाखा युनिट १ ला याबाबत माहिती मिळताच त्यांनी आरोपीला (दि. २६) रोजी दुपारी २.२० च्या सुमारास आनंदनगर मालधक्का चौक, ओव्हर ब्रिजखाली, चिंचवड येथून ताब्यात घेतले. निकेश बाळु अल्हाट (वय २१ वर्षे, रा. एल्प्रो कंपनीसमोर, विजयनगर झोपडपट्टी, चिंचवड) असे अटक आरोपीचे नाव आहे.
त्याच्यावर चिंचवड पोलीस ठाण्यात ३२७ / २०२३ शस्त्र अधिनियम कलम ४ (२५) सह महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ३७ (१), १३५ सह १४२ सह क्रिमीनल लॉ अमेंडमेंट कलम ३, ७ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेचा पुढील तपास पो. हवा. कुंभार हे करीत आहेत.















