न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २७ जुलै २०२३) :- चिखली येथील साई आंनद प्रोजेक्ट या नावाने आरोपीच्या जागेमध्ये प्लॉटींग विक्री चालु आहे. फिर्यादी यांनी आरोपी यांच्या जागेमधील प्लॉट विक्रीची जाहीरात वाचुन आरोपीच्या ऑफीसमध्ये भेट दिली. १०३३ चौरस फुट प्लॉट सुमारे २६ लाख रुपये किंमतीला घेण्याचे ठरविले. त्याप्रमाणे बुकिंग रक्कम व प्लॉटच्या रकमेचे १० टक्के रक्कम अशी २,६६,००० रुपये फिर्यादीने आरोपीच्या बँक खात्यामध्ये जमा केली.
उर्वरीत ९० टक्के रक्कम बँकेकडुन कर्ज स्वरुपात काढावयाची असल्याने फिर्यादी यांनी कर्ज प्रकरणासाठी आवश्यक असलेली सर्व कागदपत्रे बॅकेमध्ये जमा केलेली आहेत. बँकेकडुन आरोपी यांना प्लॉटची मुळ कागदपत्रे सादर करण्याबाबत वेळोवेळी कळविलेले असताना आरोपी यांनी कागदपत्रे बॅकेमध्ये दाखल केलेली नाहीत. आरोपी यांनी मुदतीत कागदपत्रे तपासणीकरिता बँकेमध्ये दाखल केलेली नसल्यामुळे फिर्यादी यांचे कर्ज मंजुरीची मुदत संपुष्टात आली. आरोपी यांनी फिर्यादीकडुन रक्कम स्वीकारुन विहीत मुदतीत बँकेमध्ये कागदपत्रे सादर केली नाहीत व फिर्यादी यांना प्लॉटची विक्री न करता त्यांची फसवणुक केली, असे फिर्यादीत नमूद आहे.
फसवणुकीचा हा प्रकार (दि. १४.११.२०२२ पासुन ते आजपर्यत) आरोपीच्या साई आनंद प्रोजेक्ट (जरे ग्रुप) गट नंबर १५८८, चिखली येथील ऑफीसमध्ये घडला. फिर्यादी रविंद्र संपत रोकडे यांनी अओपी साई आनंद प्रोजेक्ट (जरे ग्रुप) संचालक शिवलिंग जरे, सागर अगरवाल (पुर्णनाव पत्ता माहित नाही) यांच्या विरोधात फिर्याद दिली आहे. चिखली पोलिसांनी ४६७/२०२३ भादविक ४२०, ३४ नुसार दोघा आरोपींवर गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोउपनि पुजारी हे करीत आहेत.















