- नगरमधील सुप्यात जाऊन पोलिसांनी आरोपींचे वाजविले सूप…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २८ जुलै २०२३) :- खेड तालुक्यातील कुरुळीमधील एम आर सुर्या इलेक्ट्रॉनिक्स इंडीया प्रा. लि. या गोडाऊनमधून (दि. २२ ते २३) अज्ञात चोरटयाने शटर उचकटुन २५,१७,०८७ रुपये किंमतीचे वेगवेगळया कंपनीचे व आकाराचे एलईडी टिव्ही चोरुन नेले होते. याबाबत महाळुंगे एमआयडीसी पोलीस स्टेशनमध्ये चोरीचा गंभीर स्वरुपाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
महाळुंगे एमआयडीसी पोलीसांच्या तपास पथकाने घटनास्थळावरील सीसीटिव्ही फुटेज तपासले. गोडाऊनसमोर गाडीचे रेडीयम चमकत असल्याचे दिसल्याने त्यावरुन घटनास्थळ ते सुपे टोलनाका अहमदनगरपर्यंत एकुण ४५ सीसीटीव्ही कॅमे-याची पाहणी करुन गाडीचा शोध घेतला. सुपे टोलनाका सीसीटिव्ही कॅमे-यामध्ये टाटा कंपनीचा ११०९ टेम्पो नंबर एम एच २० डीई ३८९० असा असल्याचे निष्पन्न झाले.
आजीज पाशा शेख (वय ६० वर्षे, धंदा- ड्रायव्हर, रा. टाकळी ता. खुलताबाद, जि. छत्रपती संभाजी नगर), कबीर बुढन पठाण (वय- ३४ वर्ष, रा. मुळ पत्ता -आष्टी, ता. परतुन जि. जालना सध्याचा पत्ता भारतनगर, वाळुंज, ता. गंगापुर जि. औरंगाबाद) या आरोपींची नावे निष्पन्न झाली. त्यानुसार कबीरला ताब्यात घेवुन तपास केला. त्याने गुन्हा केल्याची कबुली दिली असुन चोरीस गेलेला माल १९, ९०, ४९८ रुपये किंमतीचा हायर व कोडॅक कंपनीचे वेगवेगळे आकाराचे ६१ टिव्ही व ६ लाख रुपये किंमतीचा टाटा कंपनीचा टेम्पो पोलिसांनी जप्त केला आहे.
सदरची कारवाई पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, सह पोलीस आयुक्त संजय शिंदे, अपर पोलीस आयुक्त वसंत परदेशी, पोलीस उपआयुक्त विवेक पाटील, सहाय्यक पोलीस आयुक्त राजेंद्रसिंग गौर यांच्या सुचना व मार्गदर्शनाखाली वरीष्ठ पोलीस निरीक्षक वसंतराव बाबर, पोलीस उप निरीक्षक विलास गोसावी, पोहवा राजू कोणकेरी, अमोल बोराटे, युवराज बिराजदार, संतोष होळकर पोना संतोष काळे, किशोर सांगळे, विठ्ठल वडेकर, मपोना जमदाडे पोकॉ/ शिवाजी लोखंडे, बाळकृष्ण पाटोळे, शरद खैरे, राजेंद्र खेडकर, संतोष वायकर, गणेश गायकवाड, राहुल मिसाळ, अमोल माटे, वाळुंज पोलीस स्टेशनकडील पोना/ विजय पिंपळे यांनी केली आहे. पुढील तपास पोलीस उप निरीक्षक प्रदिप गायकवाड, महाळुंगे एमआयडीसी पोलीस स्टेशन हे करीत आहेत.
कंपनीना आवाहन…
कंपनी परिसरामध्ये सिक्युरिटी गार्ड नेमावेत. तसेच सीसीटिव्हि कॅमेरे व लाईट लावाव्यात. तसेच कंपनी परिसरामध्ये संशयित इसम फिरताना मिळुन आल्यास पोलीसांशी संपर्क साधावा. त्यामुळे कंपनीमधील चोरीस प्रतिबंध निर्माण होईल.












