न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २८ जुलै २०२३) :- हॉटेलमधील काम संपवून फिर्यादी यांची बहिण राहत्या घरी पायी परत येत असताना पाठीमागुन आलेल्या वाहनावरील चालकाने वाहन हयगयीने, भरधाव वेगाने, निष्काळजीपणे चालवुन वाहतुकीच्या नियमांकडे दुर्लक्ष करुन त्यांना जोरदार धडक दिली. अपघातात गंभीर जखमी झालेल्या फिर्यादीच्या बहिणीचा जागीच मृत्यू झाला. आरोपी वाहनचालक अपघातस्थळी न थांबता निघून गेला.
तसेच फिर्यादीच्या बहिणीच्या मत्युस कारणीभुत झाला, असे फिर्यादीत नमूद आहे. हा अपघात (दि. २५) रोजी ११.३० च्या सुमारास दुर्गामता सुपर मार्केट जवळ, आंबेडकर नगर, चिंचवड येथे घडला.
फिर्यादी साहेबराव रावण बचुटे यांनी आरोपी चारचाकी वाहन (एमएच१४जेएम९१३१) वरील चालक (नाव पत्ता माहित नाही) याच्या विरोधात फिर्याद दिली आहे. पोउपनि ताकतोडे हे घटनेचा पुढील तपास करीत आहेत.


















