न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २९ जूलै २०२३) :- रस्त्यावरुन पायी जात असताना फिर्यादी महिलेच्या तोंड ओळखीचा व्यक्ती तिथे आला. त्या आरोपीने फिर्यादी यांचा हात पकडुन ‘ तु मला खुप आवडतेस माझे तुझ्यावर प्रेम आहे ‘ असे बोलून फिर्यादीच्या मनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले. फिर्यादीचा विनयभंग केला, असे फिर्यादीत म्हटले आहे.
ही घटना (दि. २८) रोजी सकाळी ०८.१५ वाजता लक्ष्मी वजन काटयाजवळ, सार्वजनिक रोडवर, रुपीनगर, तळवडे येथे घडली. महिला फिर्यादीने आरोपी मारुती भोईनवाड याच्या विरोधात फिर्याद दाखल केली आहे.
चिखली पोलीसांकडुन ४७० / २०२३ भादवी कलम ३५४ प्रमाणे आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस ठाण्याचे पोलीस उप-निरीक्षक एम डी मुळीक हे पुढील तपास करीत आहेत.















