- बावधनच्या साई व्हेलोसिटीमधील घटना; बिल्डरविरोधात पोलिसात तक्रार…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २९ जूलै २०२३) :- लिफ्टमधुन सातव्या मजल्यावर फिर्यादीची पत्नी आणि आणखी एकजण जात होते. दरम्यान लिफ्ट ७ व्या मजल्यावर न थांबता १० व्या मजल्यावर गेली. काही सेकंद थांबली व दरवाजा उघडला. त्यामुळे फिर्यादी यांची पत्नी व आणखी एकजण हे बाहेर पडले. त्यानंतर काही क्षणातच ती लिफ्ट तेथुन दरवाजा बंद न होताच खाली तळमजल्यावर जावुन आदळली.
या प्रकारामध्ये जिवितहानी झाली नाही. कोणास काहीएक लागलेले नाही. परंतु, सदर लिफ्टच्या तांत्रीक दोषाबददल फिर्यादी यांनी व तेथील रहिवाशी यांनी वारंवार बिल्डरला वेळोवेळी कळवले. या लिफ्टमुळे मानवी जिवितास धोका आहे, हे माहीत असुनही आरोपी यांनी धोकादायकरित्या लिफ्ट बसवुन तसेच चालू ठेवुन व रिटेक कंपनीला लिफ्ट मेंटनन्सबाबत वेळोवेळी कळवुनसुध्दा लिफ्टमधील तांत्रीक दोष दुर केला नाही. त्यांच्या दुर्लक्षामुळे बांधकाम साइटमध्ये राहणारे सर्व रहीवाशी तसेच फिर्यादी यांची पत्नी व आणखी एकजण यांच्या जिवीतास धोका निर्माण होणारी कृती केली, असे फिर्यादीत म्हटले आहे.
हा प्रकार (दि. २७) रोजी सायंकाळी ६.३० वाजता साई व्हेलोसिटी फेज -२, जाधववस्ती, बावधन येथे घडला. फिर्यादी भरत तात्याबा चौधरी यांनी आरोपी प्रकाश पांडुरंग चव्हाण, अनिल रामचंद्र जाधव, लिफ्ट फिटींग व मेन्टनन्स पाहणारी रिटेक कंपनी यांच्या विरोधात फिर्याद दिली आहे. हिंजवडी पोलिसांनी ८३२/२०२३ भादवि कलम ३३६,३४ नुसार आरोपींवर गुन्हा दाखल केला आहे. पोउपनि गाढवे हे घटनेचा पुढील तपास करीत आहेत.















