- बाणेरमधील प्रकार; प्रभाळे-पोरवाल बंधूवर फसवणुकीचा गुन्हा दाखल…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २९ जूलै २०२३) :- संगणमत करून आरोपींनी दलजित लछमदास जगतियाणी यांना फोर स्टार हॉटेलकरीता बाणेर येथील सर्व्हे नं. ६१/३ मधील ५७ आर क्षेत्र ९९ वर्षे भाडेकरार व हॉटेलचे बांधकाम करुन देण्यासाठी नोटराईज अॅग्रीमेंट करुन दिले होते.
त्याच्या मोबदल्यात पोरवाल बंधु व पोरवाल अॅण्ड प्रभाळे असोसिएटसच्या नावे २ कोटी ५० लाख रु घेतले आहेत. हॉटेलचे बांधकाम पुर्ण न करता, सदर पैसे हॉटेल कामकाजाकरीता न वापरता इतरत्र वापरून आरोपींनी फिर्यादीचा विश्वासघात केला आहे, असे फिर्यादीत म्हटले आहे.
हा प्रकार सन २००६ ते आजपावेतो बाणेर सर्व्हे नं. ६१ /३ बाणेर ता. मुळशी जि. पुणे येथे घडला. फिर्यादी अशोक कौरोमल इदनाणी यांनी आरोपी किशोर शेशमल पोरवाल, अशोल शेशमल पोरवाल, विजय शेशमल पोरवाल, सागर प्रभाळे यांच्या विरोधात फिर्याद दिली आहे. हिंजवडी पोलीसांनी आरोपींवर ८७५/२०२३ भादविक ४०६, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. पोउपनि खडके हे पुढील घटनेचा तपास करीत आहेत.















