न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १ एप्रिल) :- पिंपरी चिंचवड महापालिका आस्थापनेवरील चर्तुर्थ श्रेणी वर्गातून लिपिक पदावर पदोन्नती मिळविलेल्या कर्मचा-यांनी टंकलेखनाचे बोगस प्रमाणपत्र सादर करून, पदोन्नती मिळविल्याची तक्रार आयुक्तांना प्राप्त झाली होती.
त्यामुळे आयुक्तांनी सर्वच कर्मचाऱ्यांचे टंकलेखन प्रमाणपत्रे हे महाराष्ट्र राज्य परीक्षा तंत्रशिक्षण परिषदेकडून खातरजमा घेण्यासाठी पाठविली होती. त्या कर्मचा-यांचा अहवाल महापालिका प्रशासनास प्राप्त झाला आहे.
त्यानुसार ११७ कर्मचा-यांपैकी २८ कर्मचाऱ्यांचे टंकलेखन प्रमाणपत्र अवैध असल्याचा अहवाल प्राप्त झाला आहे. त्यात २८ लिपिक दोषी आढळले आहेत. त्यामुळे कर्मचा-यांनी महापालिकेची दिशाभूल व फसवणूक करून, लिपिक पदावर पदोन्नती घेतल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यांची पदोन्नती पुर्वीच्या गट ड मुळ पदावर व वेतनश्रेणी पदावतन करून, त्यांची खातेनिहाय चाैकशी सुरु करण्याचे आदेश आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी दिले आहेत.










