न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ३० जुलै २०२३) :- गावठी दारूसाठी तिघांनी कच्चा माल मिश्रण रसायन आणि गावठी हातभट्टीची दारू तयार करून ती विक्री करण्याकरीता बिगर परवाना बेकायदेशिररित्या खोलीत ठेवली होती. याप्रकरणी फिर्यादी प्रसाद प्रकाश कुदळे (हॉटेल व्यवसायिक) यांनी पोलिसात फिर्याद दिली.
पोलिसांनी मळकट निळसर रंगाचे अंदाजे २०० लिटरचे ८ ड्रम, त्यामध्ये एकुण २,६०,००० रुपये किंमतीची अंदाजे १६०० लिटर गावठी दारू तयार करण्याचे (कच्चा माल मिश्रण) रसायन व १०० लिटरचे ४ ड्रम त्यामध्ये एकुण अंदाजे ४०० लिटर गावठी दारू तयार करण्याचे (कच्चा माल मिश्रण) रसायन असा मुद्देमाल जप्त केला आहे.
पिंपरी पोलिसांनी ७९९/२०२३ मुंबई प्रोव्हीबीशन कायदा कलम ६५ (फ) नुसार गुन्हा दाखल करीत आरोपी ऋषि रावळकर, महिल आरोपी, मनोज बागडे यांना सीआरपीसी ४१ (१) (अ) प्रमाणे नोटीस दिली आहे. पोउपनि सावर्डे हे पुढील तपास करीत आहेत.


















