- चिखली पोलिसांकडून दोघांना अटक…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ३० जुलै २०२३) :- आपआपसात संगणमत करुन विना परवाना फटाके बनविण्यासाठी लागणारा एकुण १००५०० रुपये किंमतीचा स्फोटक पदार्थ व केमीकल आरोपींनी जवळ बाळगला. त्यामुळे लोकांच्या जिवीतास धोका उत्पन्न होऊ शकतो.
पोलिसांनी (दि. २९) रोजी सायंकाळी ५.०० च्या सुमारास गट नंबर १५४८, सोनवणे वस्ती, एन.जी.मेटल शॉपचे शेजारील पत्र्याचे शेडसमोर, चिखली येथे कारवाई करून आरोपींना ताब्यात घेतले.
चिखली पोलिसांनी ४७६/२०२३ भादवी कलम २८६, ३३६, १८८, ३४ सह स्फोटक पदार्थ अधि. १९०८ चे कलम ४, ५ महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ३७ ( १ ) / १३५ प्रमाणे आरोपींवर गुन्हा दाखल केला आहे. विक्रांत राज देशमुख, संतोष तायप्पा शिवशरण असे अटक आरोपींचे नाव आहे. सपोनि न्यामणे हे पुढील तपास करीत आहेत.















