न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ३१ जुलै २०२३) :- संगणमताने स्पा सेंटरच्या नावाखाली पिडीत महिलांना पैशांचे अमिष दाखवले. त्यांना स्पा मसाज सेंटरच्या नावाखाली प्राप्त केले. वेश्या व्यवसायासाठी प्रवृत्त करून त्यांच्याकडून वेश्या व्यवसाय करुन घेऊन त्यातून मिळालेल्या रकमेतून स्वतःची उपजिवीका भागविली.
(दि. २९) रोजी रात्री ८.२० च्या सुमारास, स्पाईन रोड, मोशी येथे पोलिसांनी कारवाई केली. दोघांना ताब्यात घेतले.
भोसरी एमआयडीसी पोलिसांनी ३२८/२०२३ भा.द.वि. कलम ३७० (३), ३४ सह अनैतिक व्यापार प्रतिबंध अधिनियम १९५६ चे कलम ३,४,५ अन्वये महिला आरोपी, निखील गजानन चौधरी (वय ३२ वर्षे रा. टेल्को कॉलनी नं- ३, तानाजी रोड, तिन्हेवाडी ता.खेड जि.पुणे) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. वपोनि निकाळजे पुढील तपास करीत आहेत.















